Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • विदर्भ
  • नागपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा
  • विदर्भ

नागपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा

NewWaniDiary 29/09/2025

▪️नागपूर येथील वर्धापन दिनाला लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन रिपाइंची ताकद दाखवा – जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे

नागपूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा वर्धापन दिन व कार्यकर्ता मेळावा दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता अमृत भवन, नार्थ अंबाझरी रोड, युनिव्हर्सिटी वाचनालयाजवळ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन व अध्यक्षस्थान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई भूषवणार आहेत. राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे, राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. प्रा. अजितसिंह चहल, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जकप्पा कांबळे, गुजरात राज्य सरचिटणीस गोविंदभाई पधीयार, रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर २१ सप्टेंबर रोजी मौजा थुट्रा येथे प्रचारसभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थान रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे यांनी भूषवले. यावेळी बोलताना त्यांनी आवाहन केले की – “नागपूर येथील रिपाइंच्या वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांच्या विचारांची ताकद दाखवा.”

सभेत नागपूर प्रदेश उपाध्यक्ष नेताजी बुरचुंडे, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, जिल्हा संघटक अशोककुमार उमरे, युवा अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर खाडे, गौतम भसारकर, बल्लारशा अध्यक्ष अजय चव्हाण, ऍड. प्रियांका चव्हाण आदींनी स्थानिक समस्यांवर विचार मांडले.

बैठकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प वंदन, अगरबत्ती व मेणबत्ती अर्पण करून त्रीशरण पंचशील पठणाने झाली. यावेळी थुट्रा येथील कार्यकर्ते विजय चुनारकर, जगदीश धवने, राजेंद्र चुनारकर, गोविंदा इंगोले, बोधकीर्त नरवाडे, नितेश रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जगदीश धवने यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेश रामटेके, संचालन अशोककुमार उमरे तर आभार प्रदर्शन सुरजभाऊ उपरे यांनी केले.

या प्रचारसभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Continue Reading

Previous: राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न ‌‌
Next: नवरात्रात दारू दुकाने नियमबाह्य सुरू; नागरिक त्रस्त

Related Stories

SAVE_20250612_181122
  • विदर्भ

शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या बच्चु कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा!

NewWaniDiary 12/06/2025
SAVE_20250501_151958
  • विदर्भ
  • चळवळ

वणी येथे: महाराष्ट्र दिनाचा निषेध!आंदोलन समितीने काळा दिवस पाळला..

NewWaniDiary 01/05/2025
SAVE_20250425_104235
  • विदर्भ

विदर्भ राज्य आंदोलन समितीची पुढील आंदोलनाच्या चर्चेकरीता बैठक संपन्न..

NewWaniDiary 25/04/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.