Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • नवरात्रात दारू दुकाने नियमबाह्य सुरू; नागरिक त्रस्त
  • वणी

नवरात्रात दारू दुकाने नियमबाह्य सुरू; नागरिक त्रस्त

NewWaniDiary 29/09/2025

वणी (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवानिमित्त वणी शहरात तालुक्यातील तसेच बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात नागरिक देवीदर्शनासाठी येतात. मात्र अशा पवित्र वातावरणात दारू दुकाने व बिअर बारकडून शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

शासनाने सकाळी १० नंतर दुकाने सुरू करण्याचे निर्देश असतानाही शहरातील काही परवानाधारक दारू दुकाने सकाळी ७ ते ८ वाजताच सुरू होत असल्याचे आढळले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही बिअर बार रात्री १२ नंतरही सुरू राहून पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी तर पहाटे ६ वाजता बिअर बार सुरू होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे ही दुकाने कॉलेज, दवाखाने आणि बसस्थानक परिसराच्या अगदी जवळ सुरू असून, मद्यपींच्या त्रासदायक वर्तनामुळे कॉलेज विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर धिंगाणा, शिवीगाळ व आडवे मोटरसायकल उभे केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक चिंतेची बाब म्हणजे काही बिअर बारमध्ये खराब दर्जाची दारू खुलेआम विकली जात असल्याचे मद्यसेवन करणाऱ्यांकडून समोर आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर तातडीने लक्ष घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दारू दुकाने व बिअर बारवर कठोर कारवाई करावी आणि खराब दर्जाच्या दारूची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

Continue Reading

Previous: नागपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा
Next: बारसमोर युवकाला मारहाण; जखमी चंद्रपूरला हलवला

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.