Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी टिळेकर तर निमंत्रकपदी नामगुडे यांची निवड
  • महाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी टिळेकर तर निमंत्रकपदी नामगुडे यांची निवड

NewWaniDiary 13/12/2024

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १६वे छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुप्रसिध्द ग्रामीण कवी किशोर टिळेकर तर निमंत्रकपदी ज्येष्ठ साहित्यिक सुर्यकांत नामुगडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली.या संदर्भात सविस्तर माहिती देताना ते म्हणाले, १६वे छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन १६ डिसेंबर रोजी पुण्यातील मौलाना अब्दुल कलाम सभागृह, कोरेगाव पार्क येथे ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन विविध ठिकाणी दरवर्षी करण्यात येते. संमेलनाच्या नियोजनासाठी नुकतीच एक बैठक पुण्यात संपन्न झाली.

यावेळी सर्वानुमते स्वागताध्यक्ष व निमंत्रक यांची निवड करण्यात आली. तसेंच साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक, प्रदेश संघटक अमोल कुंभार, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जयश्री नांदे, पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश वाळेकर, खेड तालुकाध्यक्ष मधुकर गिलबिले, भोर तालुकाध्यक्ष रमेश रेडेकर, पुणे शहर उपाध्यक्ष सिंधु साळेकर, सरचिटणीस बाळकृष्ण अमृतकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: प्रकाशनार्थ
Next: वणी विधानसभा मतदारसंघातील गाव तिथे भाकपच्या शाखा स्थापुन येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार -काॅ.अनिल हेपट

Related Stories

SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
SAVE_20250816_200833
  • महाराष्ट्र

माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

NewWaniDiary 16/08/2025
SAVE_20250807_132715
  • महाराष्ट्र

फ्रीशीप पोर्टलवरील तृटी दूर करून M.B.B.S. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत – डॉ. राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

NewWaniDiary 07/08/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.