-अंकुश शिंगाडे नागपूर

ही दिवाळी की दिवाळा. प्रत्येक घटस्फोटीत मुलांमुलींच्या आयुष्याचा प्रश्न. कारण घटस्फोटानं प्रत्येकाच्या घरची दिवाळी साजरी होत नाही तर संसाराचा दिवाळाच निघत असतो. ज्या घटस्फोटात खुद्द आईवडील वा उमेदवाराचे नातेवाईक हस्तक्षेप करुन खतपाणी घालत असतात. अन् वकील तेल, तिखटमीठ लावत असतात.
पती हा आपल्या पत्नीवर निरतिशय प्रेम करीत असतो. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होत नाही. तो तिचंच ऐकतो आणि तिच्याच मनानं चालत असतो. त्याच प्रेमाचा फायदा घेवून प्रसंगी ती त्याच्या आईला वृद्धाश्रमात टाकत असते तर कधी त्याची भाऊ बहिण तोडत असते. नातेवाईकांचा प्रश्न तर वेगळाच राहिला.
वृद्धाश्रमात जो पती आपल्या आईवडीलांना टाकतो. तरीही तिला तो पती आवडत नाही. त्या पतीचं आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकणं आवडतं. कारण तिला ती कोणतेही कृत्य करेना, तिला टोकणारा कुणी गृहस्थ घरेत असायला नको वा कोणाची कोणतीच वटवट घरात ऐकू यायला नको. दुसरा प्रश्न असतो. तो म्हणजे तिच्या आईवडील भावाचा हस्तक्षेप घरात होणं. जर तिच्या पतीचे आईवडील घरात असतील तर तिला आपले आईवडील घरात आणताच येत नाही वा भाऊबहिण आणि नातेवाईकांना घरात प्रवेश देताच येणार नाही. अशी तिची भावना असते.
पत्नी आणि पतीतील किरकोळ ही भांडणं. ज्यात पतीला पत्नी ही एक आपला गुलाम समजते. पतीनं थोडासा जरी आवाज चढवला की बस, सारंच त्याचं चुकलं असा कावा ती करते. ज्यातून पत्नीला बोलायची उजागीरीच नसते.
पती पत्नीच्या स्वभावाचं वर्णन केल्यास असं जाणवतं की एखादी गोष्ट करायची असल्यास पत्नी रोजच पतीमागं तकादा लावते. अर्थात ती मागणी पुर्ण होईपर्यंत लावून धरते. जर ती मागणी पुर्ण झाली की ती फारच आनंदीत होते. तशीच ती मागणी बरेचवेळेस तकादा लावूनही पुर्ण होत नसेल वा जर पुर्ण झाली नाही तर ती निराश होते. तिला पती हा कर्दनकाळच वाटतो. अशावेळेस तिच्या मनात संभ्रमच निर्माण होतो व त्याची परियंती तिची सोडून जाण्यात होते.
संसार टिकवणंही तारेवरची कसरतच आहे. संसार त्याचाच टिकतो. ज्याची पत्नी संयमी व समजदार असते. ती आपला संयम सोडत नाही. वाट पाहात असते क्षणाची. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. काही पत्नीवर्ग मात्र उतावीळ असतो. त्यांना पुरेशी वाट पाहण्याची उसंतच नसते. त्यांना वाटत असते की कोणतीही गोष्ट ही आताच व्हायला हवी. जर ती होत नसेल तर ती निराश होते.
पत्नी संयमी असल्यानं भागत नाही तर पत्नी ही व्याभिचारीही नसावीच. अलिकडच्या मुली या व्याभिचारी असतात. काहींना विवाह केल्यानंतरही बाहेर लपडी कराविशी वाटतात. पतीला त्या कचराच समजतात आणि विवाहाला एक करार. ज्यातून फक्त लोकांनी नावबोटं वा दुषणं देवू नये. म्हणून त्या विवाह करतात. काही पत्नी ह्या कष्ट न करता ऐषआरामात एकटंच जीवन जगता यावं म्हणून विवाह करतात व विवाह झाल्यानंतर आपल्या पतीला सोडून जातात. शारिरीक भूक ही एखादा बॉयफ्रेंड ठेवून भागवतात. पतीकडून खावटी रुपानं पैसा वसूल करतात व एकट्याच राहून ऐषआरामाचं जीवन व्यथीत करीत असतात. असं बरेचदा घडतं.
मुली विवाह केल्यानंतर जेव्हा आपल्या पतीला सोडून जातात. तेव्हा आपल्या मुलाबाळांचाही विचार करीत नाहीत. मुलांना काय हवं असेल, काय हवं नसेल? याचा विचार नसतोच. त्यांना आईचं प्रेम मिळालं नाही तर काय होईल? वडिलांचं प्रेम मिळालं नाही तर काय होईल? याचा विचारच नसतो. अन् तसा विचार न करता अशा मुली सोडून जातात आपल्या पतीला. ज्यात मुलांना कधी आईचं तर कधी वडीलांचं प्रेम मिळत नाही. नुकसानच होतं मुलांच्या भावनांचं.
खरं सांगायचं म्हणजे मुलं फार प्रेम करीत असतात आपल्या पत्नीवर. तिच्यावर जीव ओवाळून टाकत असतात. तिच्यासाठी शपथा घेणारी ही मुलं प्रसंगी आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमातही टाकत असतात. त्यांनाही वाटत असते की ती असली तर घरी दिवाळी असते आणि ती नसली तर घराचा दिवाळा निघतो. तिच्या प्रेमासाठी ते सगळं सहन करतात. ज्या आईवडीलांनी त्याला जन्म दिला, त्या आईवडीलांचं वृद्धाश्रमात जाणंही पसंत करतात. बहिण, भाऊ, नातेवाईक सारेच तोडतात ते. परंतु ते शेवटी हरतात. मग आठवतात त्यांना भाऊबहिण आणि त्याचे आईवडील. बिचाऱ्यांनी त्यांचा संसार चालावा म्हणून त्याच्या संसारात दखलंदाजी केलेली नसते. कुरकूर नसतेच त्यांची.
महत्वाचं सांगायचं म्हणजे मुलींनी विवाह करुन सासरी नांदायला जातांना विवाहापुर्वीच विचार करावा की मला नांदायचं आहे की नाही. मग कितीही संकटं का येणार असेना. मी आपल्या पतीला सोडून जाणार नाही.
पुर्वी मुलगी विवाह करायची. तिचा बालवयातच विवाह व्हायचा. ते बालवय की ज्या बालवयात तिला समजदारी नसायची. ती आपल्या पतीला सोडून जायची नाही. मग तिच्यावर कितीही अत्याचार होत असले तरी. कारण ती आत्मनिर्भर नसायची व स्वतःच्या पायावर उभीही नसायची की ज्यातून ती आपलं स्वतःचं पोट भरु शकेल. तसं पाहिल्यास त्या काळात खुद्द तिचे आईवडीलही विवाह करतांनाच म्हणायचे की बाई परत येवू नकोस. दिल्या घरी सुखी राहा. तू जर घरी परत आली तर तुझ्या या लहान लहान भावाबहिणींचे विवाह होणार नाहीत. हं, जर पतीनं तुला टाकलंच तर मरुन जायचं एखाद्या विहिरीत उडी मारुन. परंतु या घरी परतीचा मार्ग पत्करायचा नाही.
तो अत्याचारच असायचा तिच्याच आईवडीलांकडून झालेला. एकतर बालविवाह करायचे मायबाप. तिला विवाहाची समजदारी येण्यापूर्वीच. अन् दुसरं म्हणजे तिला सासरकडील अत्याचार झाल्यास परत यायला मार्ग नसायचा. ज्यातून घटस्फोटाचे प्रमाणच कमी होते.
आज तसं नाही. ते बालवय की ज्या बालवयात तिला आईवडील समजायचे. परंतु सासूसासरे म्हणजे काय? हे तिला समजायचं नाही. अशा वयात घरी पत्नी म्हणून आलेली मुलगी कधी माहेरची आस धरत नसे. तशीच त्या काळात जास्त मुलं मुली असल्यानं आईवडीलही मुलींची आस करीत नसत. अशातच एखाद्या मुलानं दुसरी, तिसरी पत्नी आणली तरी सवत म्हणून तिचा आनंदाने स्विकार करीत असे ती. मात्र आज काळ बदलला व बदलत्या काळानुसार त्या गोष्टीला अत्याचार समजू लागले लोकं व तशा पद्धतीची पुरुषांची कृती ही अन्यायकारक वाटू लागली. ही गोष्ट एवढ्यापुरती ठीक आहे. परंतु त्याहीपुढे जावून आजच्या मुली मुलांना आपल्या खेळण्यातील कळसुत्री बाहुला समजत त्याच्याशी बाहुल्यासारख्याच वागत असतात. हवं तसं आपल्या जिद्दीनं वाकवतात आणि नाही वाकला तर घटस्फोट घेवून त्यांच्याचकडून खावटी वसूल करुन ऐषआरामात जीवन जगतात. कारण आजचे विवाह हे वयात आल्यावर होतात की ज्या काळात समजदारी आलेली असते. ज्या काळात त्या आत्मनिर्भर झालेल्या असतात. अशा काळात काय वाईट काय चांगलं. ते त्यांना चांगलं कळतं. तसंच आजच्या काळात काही महिलांना आपल्या मुलाबाळांचंही काही घेणंदेणं नसतं. कारण आजच्या मुली या स्वतः आत्मनिर्भर झाल्या आहेत व त्यांना आजच्या काळात कोणाच्याच पोषण्याची गरज उरलेली नाही. शिवाय ज्या पती असलेली मुलं जर पत्नी असलेल्या मुलींचं थोडंफार ऐकत नसतील तर पटकन फारकत घेवून त्या मोकळ्या होतात. अन् त्याला खतपाणी घालतात, त्या मुलामुलींचे आईवडील, काही नातेवाईक व इष्टमित्र. विवाहात लाखो रुपये खर्च होणाऱ्या प्रकाराला अशा पद्धतीनं चुना लावला जातो. शिवाय त्याला तिखटमीठ लावतात वकील. कारण त्यांना पोटासाठी फीच्या रुपात पैसा हवा असतो. मात्र कधी कधी दोष पुरुषांचा नसतोच. तरीही त्यालाच दोषी धरत खावटीसह सर्व पैसा हा पुरुषांकडूनच वसूल केला जातो, स्वतःचं जीवन ऐषआरामात जगण्यासाठी. तसं पाहिल्यास आजच्या विवाहाला कराराचेच स्वरुप आलेले आहे. विवाह हा एक संस्कार. ही प्रक्रियाच आता कालबाह्य होत चाललेली आहे.
विशेष सांगायचं झाल्यास आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढत चाललेले असून विवाहाला कराराचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. ज्या घरात मुली संसार करतांना संसार हा संयम राखून करतात. व्याभिचारी नसतात. त्यांचा संसार टिकतो. अन् ज्या घरात असं नसतं. त्यांचा संसार तुटतो.
महत्वपुर्ण बाब ही लक्षात घ्यायला हवी की मुलामुलींनी विवाह करावेत. परंतु विवाह करण्यापुर्वी स्पष्ट नकार द्यावा जर विवाह करतांना त्याला करार समजत असाल तर. असा करार समजल्यानं आपलंच जीवन, आपलंच आयुष्य उध्वस्त होत असते. अन् विवाहाला संस्कार समजत असाल तर आपलंच भविष्यातील आयुष्य सुखकारक व मंगलमय बनू शकते हे तेवढंच खरं.
विशेष म्हणजे आपल्या कृतीनं कुणाचं जीवन उध्वस्त करु नये. कारण एक संसार जेव्हा तुटतो ना. त्यात बऱ्याच स्वरुपाचं नुकसान होत असतं. आपले आईवडील, नातेवाईक, आपली मुलं, आपले मित्र आपण स्वतः असे सारे हळहळत असतात. ज्यांचा शाप आपल्यालाच लागतो व आपलं जीवन भविष्यात कधीच सुखी बनू शकत नाही व जर विवाहाला आपण संस्कार समजत असल्यास आपलंच जीवन सुखी होतं. त्यातच प्रत्येक दिवस आपल्याला दिवाळी आणि प्रत्येकच क्षण आपल्याला विजयादशमी वाटत असते. असाच आपला संसार असावा व आपलं वागणंही तसंच असावं. जेणेकरुन आपली मुलंच नाही तर आपले आईवडील, आपले नातेवाईक व आपला परीवार सुखी होईल व प्रत्येकजण म्हणेल, संसार करावा तर त्यांनीच, ज्यांची दिवाळी चांगली उजळेल. जर संसार चांगला झाला नाही तर आपली दिवाळी साजरी होणार नाही. त्यातच आपलाच संसार आपला दिवाळा काढल्याशिवाय राहणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
