
वणी (प्रतिनिधी) : वणीचे सेवानिवृत्त माजी तहसीलदार, ज्येष्ठ मित्र तसेच सिनियर सिटीजन ग्रुपचे सदस्य दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपूरे यांनी भारतीय संविधानाचे पुस्तक भेट देऊन दिगंबर गोहोकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दि. ४ सप्टेंबर रोजी, छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, साधनकरवाडी, चिखलगाव येथे साई दर्पण ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला साई दर्पण ग्रुपचे सदस्य, सिनियर सिटीजन ग्रुपचे सदस्य, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी दिगंबर गोहोकार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, आनंदी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

