
वणी (प्रतिनिधी) : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त जमात-ए-इस्लामी हिंद, वणी यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी वणी शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जमात-ए-इस्लामी हिंद, वणीच्या वतीने मागील १२ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही मानवतेच्या सेवेसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून संकलित होणारे रक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर तसेच लाईफ लाईन यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
“रक्तदान करा, जीवनदान द्या” या संदेशातून जात, धर्म, भाषा किंवा पंथाची सीमा न मानता सर्व समाजबांधवांनी रक्तदान करून मानवतेच्या सेवेत योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराचे आयोजन दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वणी येथे करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


