Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी तालुक्यातील;अवैध रेती तस्करी शहरामध्ये साठवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू..
  • वणी

वणी तालुक्यातील;अवैध रेती तस्करी शहरामध्ये साठवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू..

NewWaniDiary 09/03/2025

▪️ रेतीचे तस्करीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बाहेरगावचे गुंडचा सहभाग..

वणी – तालुक्यातील अवैध रेती तस्करी आणि साठवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असून, शहरातील ले-आउट आणि शासकीय गोदाम परिसरातही रेती साठवली जात असल्याची चर्चा आहे. स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण या सर्व प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे.

तालुक्यातील अधिकृत रेती घाट बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना रेती मिळवणे कठीण झाले आहे, मात्र काही बिल्डर आणि जमीन मालक मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठवून ती जास्त दराने विकत असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा व्यवसाय सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

परंतु वणी तालुक्यात रात्रीच्या वेळी खुलेआम अवैध रेती तस्करी सुरू असून, या तस्करीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बाहेरगावचे गुंडही सहभागी होत आहेत. यामुळे शहरात मोठे घातपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यासंदर्भात महसूल प्रशासन चौकशी करून ले-आउट मालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर कारवाई करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिक आणि काही स्थानिक माध्यमांकडून होत आहे.

Continue Reading

Previous: घोन्सा येथे:जागतिक महीला दिनानिमीत्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन..
Next: 🏆भारत जिंकला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.