Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • कोयला श्रमिक सभा संघटनेत: संजय खाडे यांची नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी नियुक्ती
  • वणी

कोयला श्रमिक सभा संघटनेत: संजय खाडे यांची नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी नियुक्ती

NewWaniDiary 08/12/2024



वणी येथील संजय खाडे यांची वे.को.लि नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी (टी.एस.सी मेंबर) नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त वणीतील एएसएल लॉन येथे कोयला क्षेत्रीय सभा (वणी क्षेत्र) अंतर्गत प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला हिंद मजदूर सभा H.M.S. युनियन व वणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी संजय खाडे यांनी वे.को.लि कर्मचारी व वेकोलि भागातील अधिकाधिक समस्या सोडवण्याचे वचन दिले. संजय खाडे हे आपल्या नियुक्तीचे श्रेय एच.एम.एस. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव यांना देतात.

कार्यक्रमाला एचएमएस संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कोयला श्रमिक सभेचे अध्यक्ष शिवकुमार यादव, शरद धांडे, महामंत्री व संचालन समिती सदस्य वेकोलि, दीपक जयस्वाल कोषाध्यक्ष व अध्यक्ष वेकोलि वणी क्षेत्र, विकास सोनटक्के महामंत्री, वणी क्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपस्थित मान्यवरांनी कामगारांचे हक्क, कामगार कल्याण व संघटनेच्या मजबुतीवर चर्चा केली. मोठ्या पदामुळे आता जबाबदारी वाढली आहे. वेकोलिच्या सर्व स्तरातील कर्मचा-यांच्या समस्या सोडवण्यासाठी व वेकोलि भागातील समस्या सोडवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार, असे वचन संजय खाडे यांनी दिले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वेकोलि खाण क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. वेकोलिच्या सुरक्षा समितीचे सदस्य हे एक मोठे व जबाबदारीचे पद आहे. संजय खाडे यांच्या नियुक्तीमुळे वेकोलि कर्मचारीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. खाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Continue Reading

Previous: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा
Next: माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.