Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026

वणी (प्रतिनिधी): यवतमाळ जिल्हा हा देशातच नाही तर जगात सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध आहे. असे असतानाही जिल्ह्यात कित्येक वर्षापासून शेतकरी, कामगार, योजना कर्मचारी, भूमिहीन आदिवासी व गैर आदिवासी आपले प्रश्न व समस्या घेऊन सातत्याने संघर्ष करीत आहेत, परंतु ह्या कडे सातत्याने प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या, योजना कर्मचाऱ्यांना हाल अपेष्टा तर भूमिहीन आदिवासी व गैर आदिवासी यांना स्वतःचा जमिनीपासून वंचित रहावे लागत आहे. परिणामी जिल्ह्यातील अ. भा. किसान सभा, सिटू आशा कर्मचारी युनियन लाल बावटा व महिला परिचर संघटना ( CITU ) आणि आदिवासी अधिकार मंच चा संयुक्त विद्यमाने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावाहून ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय असा १०० किमी पायी लाँग मार्च दिनांक १९ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ पर्यंत भर उन्हाळ्यात काढावा लागत आहे.

या पायी लाँग मार्च मध्ये प्रामुख्याने १. शेतकऱ्यांना २ लाख नाहीतर कोणतीही अट, निकष न लावता तसेच जून २०२६ पर्यंत थकित कर्जदारांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, २. यवतमाळ जिल्ह्याचा पीक दर पत्रक दुप्पट करावा, अतिवृष्टी बाधित घर मालकांना आर्थिक मदतीसोबत धान्यही सरसकट देण्यात यावे, ३. वन्य प्राण्यांपासून शेती व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी छत्तीसगढ च्या धर्तीवर जंगलाला कुंपण करावे.तसेच मागेल त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा योजना द्यावी, ४.वन जमीन कसणाऱ्या भूमिहीन आदिवासी व गैर आदिवासी ना कोणत्याही २ पुराव्याचा आधारावर दावा पात्र करून वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, ५. आशा कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या १ तारखेला मानधन देण्यात यावे. ६. आशांना मागील ३ वर्षांपासून रखडलेला कुष्ठरोग, हत्तीरोग, स्पुतम, क्षयरोग आदींचा सर्वेक्षणाचा मोबदला देण्यात यावा. ७. आशांना कोरोनाकाळात २४ महिने जीव धोक्यात घालून केलेल्या कार्याचा मंजूर प्रोत्साहन निधी त्वरित देण्यात यावा. ८. सहा महिन्यापासून रखडलेले केंद्राचे व राज्याचे वाढीव मानधन देण्यात यावे, ९. आशांना मंजूर करण्यात आलेली ग्रॅज्युएटी ची अंमलबजावणी करावी, १०. अंशकालीन स्त्री परिचर चे संप काळातील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ चे वेतन देण्यात यावे तसेच वाढलेले वेतन देण्यात यावे. वेतन दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत देऊन विमा कवच देण्यात यावे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे या पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय असा १०० किमी पायी लाँग मार्च मध्ये प्रामुख्याने किसान सभेचे राज्य सचिव व शेतकरी संपाचे नेते डॉ. अजित नवले सहभागी होऊन नेतृत्व करणार आहेत.

या १०० किमी पायी लाँग मार्च मध्ये हजारोच्या संख्येत शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या प्रलंबित हक्काचा मागण्या पूर्ण करून घ्यावे असे आवाहन ॲड. कुमार मोहरमपूरी, ॲड. दिलीप परचाके, ॲड. डी बी नाईक, चंद्रशेखर सिडाम, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर, प्रिती करमणकर, सुरेखा बिरकुलवार, वंदना गेडाम, कवडू चांदेकर, किसन मोहुर्ले, रमेश मिरासे, रामभाऊ जिद्दीवार, गजानन ताकसांडे, बादल कोडापे, पुंडलिक ढुंमने, श्रीकांत तांबेकर, सदाशिव आत्राम, संजय वालकोंडे, बाबुलाल टेकाम, देविदास आत्राम, शामराव जाधव, भाऊराव टेकाम, अंकलू गोंलावार, प्रकाश शंकरवार, दिलीप कुमरे , संदीप सुरपाम, अय्या आत्राम, राधाबाई मडावी, शांताबाई उरकुडे, संभा टांगे, बंडू मत्कुलवार, सतीश खडसे, अमोल चौधरी, प्रिया आत्राम, जयश्री राऊत, कुसुम बिराले, कुसुम गंधेवार, डॉ खुर्शीद वजूद आदींनी केली आहे.

Continue Reading

Previous: गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण
Next: पुस्तकांची अमूल्य शक्ती ओळखा

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.