Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • जि.आर.एन.कंपनी निलजई बेलोरा येथे स्थानीक बेरोजगारांना नौकरी द्या..
  • वणी

जि.आर.एन.कंपनी निलजई बेलोरा येथे स्थानीक बेरोजगारांना नौकरी द्या..

NewWaniDiary 26/04/2025

▪️मागण्या घेऊन कंपनीसमोर 25 एप्रील पासुन भाकपचे नेत्रुत्वात बेमुदत धरणा आंदोलन सुरु.. ‌‌‌‌‌‌

वणी : निलजई बेलोरा परिसरात जि.आर.एन.कंपनी सुरु असुन या कंपनीत परीसरातील तरुण बेरोजगारांना व स्थानिक लोकांना नौकरीत सामावून घेण्यासाठी 25 एप्रिल पासुन शिंदोला सर्कलचे भाकप नेते काॅ.मोरेश्वर कुंटलवार व काॅ.रवि गोरे यांचे नेत्रुत्वात व म.रा.किसान सभेचे राज्य‌ कौंसिलर काॅ.अनिल हेपट,भाकपचे जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे यांचे उपस्थितीत शेकडो बेरोजगार युवकांनी कंपनीसमोर बेमुदत धरणा आंदोलन सुरु केले. परिसरातील वेकोलीने शेत्या अधिग्रहन केल्याने युवकांना काम नाही त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे व शेतीवर काम करणारे शेतमजुरांच्या हाताला कामेसुद्धा राहीली नाही,दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे स्थानिक गरजू युवकांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक व कायदेशीर जबाबदारी आहे. याची जाणीव भाकपने कंपनीस अनेक वेळा करून दिली.

परंतु कपनीने कोणतेही म्हणणे ऐकूण घेण्यास तयार नाही. म्हूणन परिसरातील सर्व बेरोजगार युवक भारतीय काम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात आंदोलनास सुरुवात केली आहे.भाकपचे वणी विधानसभा क्षेत्राचे सर्वमान्य जननेते काॅ.अनिल हेपट यांनी याप्रसंगी कंपनीला ईशारा दिला दिला कि स्थानिक बेरोजगारांना कंपनी जोपर्यंत सामावून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील.धरणा आंदोलनात काॅ.मिलींद रामटेके,महेश ईंगोले,संदीप ईंगोले,सुनिल मडावी,प्रभाकर डंबारे,संतोष ईंगोले,हुसेन ईंगोले,गजाजन कोयचाडे,हनुमान भोयर,विकास कोडापे,अविनाश पचारे,अविनाश ईंगोले,प्रकाश पारशिवे,अनिल मडावी,गोसाई पारशिवे,बंडु मडावी,आनंद कोयचाडे,संताष ईंगोले,शैलेष कांबळे,ज्ञानेश्वर चौधरी,दिनेश चिट्टलवार,दिपक पारशिवे,सुरेश ईंगोले,विजु पोतराजे,शुभम टेकाम,प्रविण कामरे,शिवराम बरडे,संतोष दुर्वे,विजय डवरे,अमोल रेगुंडवार,बाबाराव पचारे,ईश्वर ईंगोले,आशिष ईंगोले,गोपाल चिटपल्लीवार,गौरव बोबडे,विनोद उईके,रवी मडावी यांचेसह शेकडो युवक सहभागी झाले.

Continue Reading

Previous: बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गतिमान..
Next: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मेंढोली येथे दि. २८ पासून आमरण उपोषण..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.