Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026

▪️वन जमीन अतिक्रमणधारकांचे एसडीओ मार्फत दिले जिल्हाधिकाऱ्यांना व्ययक्तिक अर्ज..

वणी (प्रतिनिधी) : वणी व मारेगाव तालुक्यातील वन जमीन कसणाऱ्यांनी वनाधिकार कायद्यानुसार जमिनीचा पट्टा मिळावा यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचा वतीने वणी येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 
   अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी माकप व किसान सभा सातत्याने आंदोलन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार चे वर लोकांना कॉ शंकरराव दानव यांचे नेतृत्वात पट्टे मिळाले. परंतु अजूनही महाराष्ट्रात  अनेकांना जमिनीचे पट्टे न मिळाल्याने दिनांक २७ जानेवारी ला महाराष्ट्र सरकारने नाशिक ते खर्डा काढण्यात आलेल्या लाँग मार्च ला आश्वासन दिले. 

या आश्वासनानुसार जमीन ताबेदारांनी अर्ज केल्यास दाखल केलेल्या दाव्याची पुन्हा नव्याने छाननी करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार दावे दाखल केलेल्या भूमिहीनांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया सुरु करावी यासाठी  हे एक दिवसीय धरणे आंदोलन माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ ॲड दिलीप परचाके, कॉ गजानन ताकसांडे यांचे नेतृत्वात करण्यात आले. त्या अनुषंगाने  वनजमीन कसणाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी यांना व्ययक्तिक अर्ज सादर करण्यात आले.


 ह्या आंदोलनात वणी व मारेगाव तालुक्यातील वन जमीन कसणाऱ्या पुरुष व महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.  या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी प्रचंड नारेबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे  किसन मोहुर्ले,कवडू चांदेकर, बादल कोडापे, संजय वालकोंडे, सुधाकर सोनटक्के,हरिश्चंद्र चिकराम, अरुण चिंचोलकर, शंकर गौतरे, वसंता नागोसे, रामभाऊ जिद्देवार, श्रीकांत तांबेकर, सुदर्शन टेकाम, नेताजी गेडाम, संभाजी टांगे, सुभाष नांदेकर, अर्जुन शेडमाके, अमोल चटप आदींनी परिश्रम घेतले.


Continue Reading

Previous: रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना
Next: आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.