Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026

वणी (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथील शैक्षणिक वर्ष २०००–२००२ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रम, घोन्सा येथे उत्साहात पार पडला.

जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व परस्परांतील स्नेहबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. दीर्घ काळानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. पुंडलीक शेंद्रे (सेवानिवृत्त प्राचार्य, आदर्श महाविद्यालय, घोन्सा) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मोहन उपरे (सेवानिवृत्त प्राचार्य, आदर्श महाविद्यालय, घोन्सा) होते.

विशेष अतिथी म्हणून दिलीप काकडे (अध्यक्ष, संत गजानन महाराज संस्थान, घोन्सा) उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांमध्ये विजय बोबडे, सौ. नलिनी चिव्हाणे, यशवंत रामटेके, शामसुंदर बोढे, दिनकर काळे, वसंतराव उपरे, गजानन मासिरकर, गीत घोष, दत्ताजी पेचे व अरविंद पिंपळशेंडे यांचा समावेश होता.

यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणसंस्थेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले.

मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहिल्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला. आयोजनासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन
Next: किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्येत पालकांची भूमिका

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.