Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • निलजई येथे:तिसऱ्या दिवशीही कामगारांचे उपोषण सुरू
  • वणी

निलजई येथे:तिसऱ्या दिवशीही कामगारांचे उपोषण सुरू

NewWaniDiary 30/01/2025

वणी – निलजई येथे एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपन्यांनी 65 कामगारांना नोकरीतून कमी केल्यामुळे हे कामगार सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर उपोषणाला बसले आहेत. तिसऱ्या दिवशी वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी कंपनीच्या मॅनेजर व इनचार्ज सोबत चर्चाही केली, मात्र व्यवस्थापनाचा अडेलतट्टूपणा दिसून आला.

कामगारांच्या या समस्या लढ्यासाठी स्थानिक खासदार, आमदार व अधिकारी अद्याप पुढे आलेले नाहीत. त्यामुळे कामगारांनी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय खाडे वरिष्ठ स्तरावर चर्चा करत असून, कामगारांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे.

स्थानिकांना रोजगार देणे कंपनीचे कर्तव्य असून, या कंपनीत इतर राज्यातील लोकांना काम दिले जात असताना लोकप्रतिनिधी आणि कंपनी स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जात आहे. कंपनीने कामगारांना तात्काळ पुन्हा नोकरीवर घ्यावे, अशी मागणी होत आहे. सुमारे 40-50 कामगार उपोषणाला बसले असून त्यात विशाल गोवारदीपे, कानुजी लोनगाडगे, प्रभाकर खोब्रागडे, संदीप भोयर यांसारख्या कामगारांचा समावेश आहे.

Continue Reading

Previous: शिवसेना कार्यकर्ते:ललित लांजेवार यांचे निधन..
Next: कॉ. दानव यांच्या प्रथम स्मृती दिनाला झालेल्या मेळाव्यात मार्गदर्शकांचे सुर

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.