Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • महाबोधी बोधगया व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती देण्याची मागणी..
  • वणी
  • चळवळ

महाबोधी बोधगया व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती देण्याची मागणी..

NewWaniDiary 05/03/2025

▪️ देशभर आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध समाज या मागण्यांसाठी लढा देत…

वणी –  महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनावर बौद्ध समाजाचा हक्क असावा, अशी मागणी विविध बौद्ध संघटनांकडून केली जात आहे. वणी येथील 5 मार्च 2025 रोजी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट वणी आणि समस्त आंबेडकरी अनुयायी समाजबांधवांनी वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन दिले.

त्यांच्या मुख्य मागण्या आहेत:
बुद्धिस्ट टेम्पल अँक्ट 1949 रद्द करणे: सध्याच्या कायद्यानुसार महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनात बौद्धेतर व्यक्तींनाही सहभाग आहे. बौद्ध समाजाच्या मते, हे त्यांच्या धार्मिक हक्कांचे उल्लंघन आहे.

महाबोधी बोधगया पूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती देणे:
महाबोधी मंदिर हे जागतिक बौद्ध समाजासाठी सर्वोच्च पवित्र स्थळ आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन आणि प्रशासन बौद्ध समाजाच्या हाती असावे, अशी त्यांची मागणी आहे.

या मागण्यांच्या समर्थनार्थ, 12 फेब्रुवारी 2025 पासून भिक्खू महाबोधी बोधगया व्यवस्थापनाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध समाज या मागण्यांसाठी लढा देत आहे.

Continue Reading

Previous: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय..
Next: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.