
वणी – ऑल इंडिया बुध्दीस्ट फोरम आणि भारतीय बौद्ध महासभा, वणी तालुका (जि. यवतमाळ) यांच्या वतीने महाबोधी महाविहार, बोधगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन सोमवार, १० मार्च रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे सुरू होईल. महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. सर्व सामाजिक संघटना व बौद्ध समाजबांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

