Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • घूगूस येथील;सभागृहाची दयनीय अवस्था झाली असून सौंदर्यकरण्याची मागणी..
  • चंद्रपूर

घूगूस येथील;सभागृहाची दयनीय अवस्था झाली असून सौंदर्यकरण्याची मागणी..

NewWaniDiary 22/03/2025

घूगूस येथील: दि. 21 मार्च रोजी, आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या घूगूस येथील जनता दरबारात संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था घूगूसचे अध्यक्ष गणेश शेंडे आणि गणेश वझे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यामध्ये, घूगूस येथील WCL ने २५ वर्षांपूर्वी लोक कल्याणासाठी व सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी नायब तहसील कार्यालय व पटवारी कार्यालय असलेले सभागृह बांधले होते, परंतु आज त्याची अवस्था दयनीय झाली आहे आणि त्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही.

त्यामुळे आमदार साहेबांना विनंती करण्यात आली की, सदर सभागृह लोक कल्याणासाठी मोकळे करून, त्याचे सौंदर्यकरण व सुशोभीकरण करावे. आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

या निवेदनावेळी संतोष साईबाबा, गणेश शेंडे, गणेश वझे, मधुकर मालेकर, शंकर कामतवार, पंकज बावणे, सचिन बोंडे, श्रीकांत पं. आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: नागपूर घटनेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याचे पोलीस विभागाला निर्देश..
Next: वणी शहरात;अनेक ठिकाणी अवैध रेती मोठ्या ट्रकांनी टाकली जात..

Related Stories

SAVE_20260711_155021
  • चंद्रपूर

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

NewWaniDiary 11/07/2026
SAVE_20260605_121529
  • चंद्रपूर

स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

NewWaniDiary 05/06/2026
SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.