Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार
  • चंद्रपूर

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

NewWaniDiary 11/07/2026

राजुरा (प्रतिनिधी): वाहन चालक कामगारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेली पंजीबद्ध अनैशा वाहन चालक कामगार संघटना ही संघटना अपघातग्रस्त चालकांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी “अपघातग्रस्त कुटुंबाला एक आधार” हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत संघटनेच्या सक्रिय सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक तसेच शैक्षणिक सहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संघटनेने घेतला आहे.

संघटनेचे सक्रिय सभासद तथा पदाधिकारी उमाकांत वाघमारे यांचे ५ मे २०२६ रोजी चंद्रपूर येथील जनता कॉलेजजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सोनम वाघमारे, मुलगा विराज (वय ११ वर्षे) आणि मुलगी कु. नव्या (वय ९ वर्षे) असा परिवार आहे.

दिवंगत उमाकांत वाघमारे यांनी संघटनेच्या कार्यासाठी सुरुवातीपासून तन, मन आणि धनाने योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे संघटनेची मोठी हानी झाली असून त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता साखरी (वाघोबा), ता. राजुरा, जि. चंद्रपूर येथे त्यांच्या निवासस्थानी संघटनेच्या वतीने सांत्वनपर भेट देण्यात आली.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी दिवंगत उमाकांत वाघमारे यांचे योगदान संघटना कधीही विसरणार नसल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबाला संघटनेतर्फे दरमहा १,५०० रुपयांचे आर्थिक योगदान देण्याची घोषणा केली. तसेच संघटनेच्या सभासदांच्या अपघातग्रस्त कुटुंबातील शाळकरी मुलांच्या शिक्षणासाठी ३० टक्के आर्थिक वाटा संघटना उचलणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

याशिवाय संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनंताभाऊ रामटेके यांनीही स्वतःच्या वतीने दरमहा १,५०० रुपयांचे मासिक योगदान देण्याची घोषणा केली. त्यांच्या पत्नी सौ. सपना अनंता रामटेके यांनी दिवंगत उमाकांत वाघमारे यांच्या पत्नी सोनम वाघमारे यांना साडी-चोळी भेट देऊन सांत्वन व्यक्त केले.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, जिल्हाध्यक्ष अनंताभाऊ रामटेके, युवा जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चंपतभाऊ राजुरकर (कुकुडसाथ), महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे, नांदेड जिल्हाध्यक्ष अय्युबभाई, सपना अनंता रामटेके, सोनम उमाकांत वाघमारे, पुष्पा प्रभुदास नंदेश्वर, अंकुश नंदेश्वर तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रंभाजी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue Reading

Previous: निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
Next: विकासाच्या नावाखाली वृक्षतोड, जलस्रोतांकडे दुर्लक्ष; वाढत्या उष्णतेने वणीकर चिंतेत

Related Stories

SAVE_20260605_121529
  • चंद्रपूर

स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

NewWaniDiary 05/06/2026
SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
SAVE_20260203_123401
  • चंद्रपूर

गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी

NewWaniDiary 03/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.