Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • चंद्रपूर येथे;खाजगी डॉक्टर कडील टीबी निक्षय मित्राचा गौरव सोहळा संपन्र!
  • चंद्रपूर

चंद्रपूर येथे;खाजगी डॉक्टर कडील टीबी निक्षय मित्राचा गौरव सोहळा संपन्र!

NewWaniDiary 29/03/2025

चंद्रपूर येथे, दि. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त खाजगी डॉक्टर कडील टीबी निक्षय मित्राचा गौरव सोहळा संपन्न झाला. जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. भास्कर सोनारकर यांनी दीप प्रज्वलन आणि डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले.

टीबी जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आणि जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारी सहभागी झाले. यावेळी खाजगी डॉक्टर कडील निक्षय मित्रांना टीबी रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी सन्मानित करण्यात आले.

यावेळी खाजगी डॉक्टरांना उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले, ज्यामध्ये डॉक्टर सौरभ राजूरकर, डॉक्टर शरयू पाजारे, डॉक्टर आनंद बेंडले, डॉक्टर प्रवीण पंत आणि डॉक्टर अमरीश बुक्कावार यांचा समावेश होता. 100 दिवसांची “क्षयरोग मोहीम” 07 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली होती, ज्याच्या अंतर्गत 481455 अतिजोखीमधील व्यक्तींची पडताळणी, 3241 निक्षय शिबिरांचे आयोजन, 10886 CBNAAT तपासण्या, आणि 25059 छातीचे एक्स-रे केले गेले.

कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन यांनी केले, आणि आभार प्रदर्शन डॉ. माधुरी टेंभे यांनी केले.

Continue Reading

Previous: वणी तालुक्यातील; ग्रामरोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची परिस्थिती..
Next: दामले फैलतील; टुपवेल बोर खूप दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना..

Related Stories

SAVE_20260711_155021
  • चंद्रपूर

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

NewWaniDiary 11/07/2026
SAVE_20260605_121529
  • चंद्रपूर

स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

NewWaniDiary 05/06/2026
SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.