Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गतिमान..
  • चंद्रपूर

बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गतिमान..

NewWaniDiary 26/04/2025

बाबासाहेब १० डिसेंबर १९५५ ला औरंगाबाद येथे मुक्कामाला असताना ‘जनता’ या आपल्या वर्तमानपत्रांला मुलाखत देताना म्हणतात- “भारतीय राज्यघटनेचे खऱ्याखुऱ्या अर्थाने पालन करण्यासाठी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करणार आहे. न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे पक्षाचे मुख्य ध्येय राहणार आहे.”

बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षांची काहीही चूक आणि अपराध नसताना त्याला बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनातून बहिष्कृत केले, हे बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांचे प्रचंड अज्ञान आहे.

आंबेडकरी विचारधाराच पाहिजे असेल तर बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्वीकारण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यासाठी बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून संविधानानुसार बहुमताने अध्यक्ष निर्वाचित करण्यासोबतच संविधानानुसार वाटचाल करण्यासाठी पुढाकार घेऊन संघर्ष करायचा आहे. कारण चुकीच्या पद्धतीने मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या आपमतलबी नेत्यांना बहुमताने बदलविण्याची आणि पुढील कार्यकाळासाठी योग्य नेता निवडण्याची सुलभ प्रणाली रिपब्लिकन पक्षाच्या संविधानात आहे.

याच संदर्भात दिनांक २२ एप्रिल २०२५ ला मौजा परसोडा त. कोरपना जि चंद्रपूर येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेमिचंद कातकर, मिलिंद कातकर आणि मंगेश नगराळे यांची ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे आले असताना मी, अशोककुमार उमरे भेट घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या संदर्भात मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात यांची विशेष आवड आणि पक्ष सदस्यत्व स्वीकारून पक्षाचे कार्य करण्याची आवड लक्षात घेऊन यांना बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे संविधान आणि बाबासाहेबांनी सर्व भारतीयांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सामील होण्यासाठी आवाहन केलेल्या प्रकटपत्राचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.

Continue Reading

Previous: राजुर येथे प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन..
Next: जि.आर.एन.कंपनी निलजई बेलोरा येथे स्थानीक बेरोजगारांना नौकरी द्या..

Related Stories

SAVE_20260711_155021
  • चंद्रपूर

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

NewWaniDiary 11/07/2026
SAVE_20260605_121529
  • चंद्रपूर

स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

NewWaniDiary 05/06/2026
SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.