Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरात नगर परिषद आवारातील झाड कोसळल्याने नागरिक गंभीर जखमी – मदतीची मागणी
  • वणी

वणी शहरात नगर परिषद आवारातील झाड कोसळल्याने नागरिक गंभीर जखमी – मदतीची मागणी

NewWaniDiary 06/05/2025

वणी – दि. ६ मे रोजी दुपारी अंदाजे २ वाजता वणी शहरातील नगर परिषद कार्यालयाच्या आवारातील एक जुने पिंपळाचे झाड कोणताही वादळ वा वारा नसताना अचानक कोसळले. या दुर्घटनेत लाठी (बेसा), ता. वणी येथील मारोती मुंगले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडीपासून पाय तुटला व कंबरेला मार लागला आहे.

घटनेची माहिती मिळताच रविंद्र धर्मराव कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या रुग्णवाहिकेतून डॉ. खापने यांच्या दवाखान्यात तातडीने आणि निःशुल्क दाखल केले. मारोती मुंगले हे अत्यंत गरिब परिस्थितीत असून त्यांच्यावर होणारा उपचार खर्च परवडणारा नाही. या पार्श्वभूमीवर रविंद्र कांबळे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देत खालील मागण्या केल्या आहेत.

१.अपघातग्रस्त व्यक्तीच्या संपूर्ण उपचार खर्चाची जबाबदारी नगर परिषदने घ्यावी.

२.त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत त्वरित द्यावी.

३.कुटुंबातील एका सदस्यास कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्यात यावी.

४.नगर परिषद क्षेत्रातील सर्व जीर्ण व धोकादायक झाडांची तात्काळ तपासणी करून अपघात टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी.

कांबळे यांनी नमूद केले की, जर नगर परिषदने यापूर्वी झाडांची तपासणी केली असती, तर हा अपघात टाळता आला असता. पुढे अशा घटनांबाबत नगर परिषद जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: आबई फाटा – वेळाबाई रस्त्याच्या बांधकामास विलंब – स्थानिकांचा उद्रेक, आंदोलन सुरु..
Next: सिंदूरचं ऑपरेशन सिंदूर

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.