▪️ लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरोदर महिलांना आणि नागरिकांचा जीव धोक्यात..


वणी: शहरातील दोन्ही रेल्वे गेटजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे परिसरात दररोज अपघात घडत आहेत. वणी-वरोरा रेल्वे गेट आणि चिखलगाव रेल्वे गेट या दोन्ही पुलाच्या बांधकाम सुरु असून आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले तसेच खळदळ रस्ते असून, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरोदर महिलांना आणि नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहे.

या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे व संबंधित प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

