Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • गौराळा जवळ वणी-मारेगाव मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचा कहर – गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ, प्रशासन व नेते मौन!
  • वणी

गौराळा जवळ वणी-मारेगाव मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचा कहर – गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ, प्रशासन व नेते मौन!

NewWaniDiary 31/05/2025

वणी – मारेगाव हा यवतमाळ जिल्ह्याचा एक महत्त्वाचा मुख्य मार्ग असून या रस्त्यावर गौराळा गावाजवळ अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना विशेषतः प्रवासी वाहनचालक व गर्भवती महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आटो-रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की, गरोदर महिला रिक्षामध्ये बसवून नेणे सध्या खूपच कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे रिक्षा चालवताना मोठ्या प्रमाणात धक्के बसतात, ज्याचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी या रस्त्याची दुरवस्था इतकी झाली आहे की, कधी कोणत्या वाहनाचा अपघात होईल सांगता येत नाही. सध्या या रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तरीही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून त्यांनी सवाल केला आहे की, “अपघात होऊन जीव गेल्यानंतरच का रस्ता दुरुस्ती होणार?”

प्रशासनाने तात्काळ या मार्गाची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी आणि नागरिकांचे जीव धोक्यात न घालता रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे.

Continue Reading

Previous: तंबाखूचे विष जाणतो, पण गांभीर्य समजत नाही
Next: वणी शहरात; अमली पदार्थांची वाढती महामारी – एम.डी. ड्रग विक्रीप्रकरणी आरोपी अटकेत!

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.