Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांवर ठोस उपाययोजना सुरू – आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने नागरिकांमध्ये आशेचा किरण
  • वणी

वणी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांवर ठोस उपाययोजना सुरू – आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने नागरिकांमध्ये आशेचा किरण

NewWaniDiary 18/06/2025

वणी (प्रतिनिधी) – वणी ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या — औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव, ट्रॉमा केअर सेंटरमधील सुविधा अपुरी असणे यावर आता ठोस पावले उचलली जात आहेत. आज आमदार संजय देरकर यांनी जिल्हाधिकारी श्री. विकास मीना यांच्यासह थेट रुग्णालयाला भेट देऊन सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

या भेटीत, स्थानिक विकास निधीतून रुग्णालयाची दुरुस्ती, कंपाऊंड वॉलचे बांधकाम, वातानुकूलन यंत्रणा बसविणे आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच, शासनस्तरावरून औषधे व वैद्यकीय साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे, याबाबतही संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून वणीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे लक्ष वेधले होते. परंतु अद्याप ठोस कारवाई होत नव्हती. यावेळी आमदार संजय देरकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन समस्यांची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे, वणीतील नागरिकांना तातडीच्या व दर्जेदार आरोग्य सेवा लवकरच उपलब्ध होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

Continue Reading

Previous: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर येथे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न!
Next: “उकणी येथील उर्वरीत जमिनीचे त्वरीत संपादन करा” – जिल्हाधिकाऱ्यांचा वेकोलि अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.