Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • गरजू विद्यार्थ्यांसाठी स्माईल फाउंडेशनचा उपक्रम; शैक्षणिक साहित्य वितरित
  • वणी

गरजू विद्यार्थ्यांसाठी स्माईल फाउंडेशनचा उपक्रम; शैक्षणिक साहित्य वितरित

NewWaniDiary 27/07/2025

▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपा – रमेश बोबडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..


वणी (प्रतिनिधी) – आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी वणीतील स्माईल फाउंडेशन ने उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. फाउंडेशनतर्फे तालुक्यातील अनाथ, दिव्यांग, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, पितृछत्र हरवलेल्या तसेच गरजू अशा १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम २४ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता स्थानिक विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमात दिवंगत दिलीप कोरपनेवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

स्माईल फाउंडेशनने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून त्यांना शालेय पुस्तके, बॅग, एक्झाम बोर्ड, वॉटर बॉटल, पेन, पेन्सील आदी साहित्य वितरित केले. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश होता. वाटप सोहळ्यास ज्योती नगरवाला, चंद्रकला मुथा, रजिया काठेड, सुरेश बनसोड, बालाजी मिलमिले आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते रमेश बोबडे उपस्थित होते.

रमेश बोबडे यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षणामुळे यशाचे शिखर गाठता येते, त्यामुळे पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या,” असे ते म्हणाले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांच्यासह पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, गौरव कोरडे, दिनेश झट्टे, कुणाल आत्राम, कार्तिक पिदूरकर, सचिन काळे, रोहित ओझा, तुषार वैद्य, युग, सचिन भोयर यांनी परिश्रम घेतले.

दानशूरांना आवाहन
हा उपक्रम वर्षभर सुरू असून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शालेय साहित्य, वस्तू, रोख किंवा धनादेश स्वरूपात मदत करता येते. देणगी वॉटर सप्लाय परिसरातील कार्यालयात स्वीकारली जाते. अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव – 7038204209 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: अभियांत्रिकी विभागाच्या विलंबामुळे आपले सरकार सेवा केंद्रे ठप्प; नागरिक त्रस्त
Next: मारेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.