Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • अभियांत्रिकी विभागाच्या विलंबामुळे आपले सरकार सेवा केंद्रे ठप्प; नागरिक त्रस्त
  • वणी

अभियांत्रिकी विभागाच्या विलंबामुळे आपले सरकार सेवा केंद्रे ठप्प; नागरिक त्रस्त

NewWaniDiary 27/07/2025

वणी (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांचे कामकाज गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाले असून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमागे अभियांत्रिकी विभागाच्या अभिप्रायातील विलंब हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात अखिल भारतीय CSC महासंघ ई-सेवा व आधार केंद्र संचालक VLE युनियन तर्फे दि.24 जुलै रोजी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. युनियनचे अध्यक्ष अरविंद गायकवाड, सचिव सचिन वाकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तातडीने दखल घेऊन अभिप्राय प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

युनियनच्या म्हणण्यानुसार, “अभिप्राय न मिळाल्याने आपले सरकार सेवा केंद्रांतून मिळणाऱ्या महत्त्वाच्या सेवा बंद आहेत. यामुळे नागरिकांना प्रमाणपत्रे, जमीन नोंदणीसह अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत.”

युनियनने प्रशासनास इशारा दिला आहे की, जर ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.

Continue Reading

Previous: वणी शहरात मोटरसायकल चोरी प्रकरण उघड – एक आरोपी ताब्यात, दोन मोटरसायकल जप्त
Next: गरजू विद्यार्थ्यांसाठी स्माईल फाउंडेशनचा उपक्रम; शैक्षणिक साहित्य वितरित

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.