Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा मार्ग जलमय; रुग्ण त्रस्त
  • वणी

वणी ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा मार्ग जलमय; रुग्ण त्रस्त

NewWaniDiary 13/08/2025
अधीक्षक डॉ. सुलभेवार यांनी रुग्णलय कर्मचाऱ्यांना घेवून स्वतः पाणी जाण्यासाठी नाली काढताना.

वणी (प्रतिनिधी) – वणी ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर बाह्यरुग्ण विभागाकडे जाणारा अंदाजे तीन फूट रस्ता पाण्याने भरून गेल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचणे कठीण झाले आहे. पावसामुळे आणि जलनिकासी व्यवस्थेअभावी हा मार्ग पूर्णपणे अडथळलेला असून, गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.

ही दयनीय परिस्थिती असताना संबंधीत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलभेवार यांनी रुग्णलय कर्मचाऱ्यांना घेवून स्वतः पाणी जाण्यासाठी नाली काढण्याचे काम हाती घेतले, ही बाब परिस्थितीची गंभीरता दर्शवते.

स्थानिक नागरिक आणि रुग्णांनी प्रशासनाला तातडीने मार्ग मोकळा करण्याची व जलनिकासीची व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे. विद्यमान आमदार, माजी आमदार “फक्त स्वातंत्र्य दिन साजरा करून चालणार नाही, प्रत्यक्ष समस्या सोडवाव्यात” असा जनतेचा सूर आहे.

Continue Reading

Previous: ग्रंथालयीन सेवासुविधांच्या उन्नतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
Next: मतदार यादी घोटाळ्याविरुद्ध काँग्रेसचा निर्धार — यवतमाळमध्ये कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.