Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • मतदार यादी घोटाळ्याविरुद्ध काँग्रेसचा निर्धार — यवतमाळमध्ये कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा
  • वणी

मतदार यादी घोटाळ्याविरुद्ध काँग्रेसचा निर्धार — यवतमाळमध्ये कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा

NewWaniDiary 13/08/2025

वणी/ यवतमाळ – भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, मतचोरी व गैरमार्गाने सत्ता मिळवली असून, हा केवळ राजकीय विषय नसून सर्वसामान्य मतदारांच्या मतदानाच्या हक्काचा सरळ अपमान आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून केला. राहुल गांधींनी मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या अन्यायाविरुद्ध तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

त्याअंतर्गत, दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ७:३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, यवतमाळ येथे “मतदान चोर, खुर्ची सोड” या घोषणेसह भव्य कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार, आमदार, माजी खासदार/आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, सर्व आघाडी संघटना व सेलचे नेते/पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन प्रदेश सचिव संजय रामचंद्र खाडे यांनी केले आहे.

“लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांच्या हक्कासाठी लढा — सामील व्हा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा!”

Continue Reading

Previous: वणी ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा मार्ग जलमय; रुग्ण त्रस्त
Next: श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या विविध शाळांचा संयुक्त स्वातंत्र्यदिन उत्सव उत्साहात संपन्न

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.