Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य – रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधांचा बोजवारा
  • वणी

वणी ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य – रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधांचा बोजवारा

NewWaniDiary 30/08/2025

वणी (प्रतिनिधी) : वणी ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून भरती रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. समाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी रुग्णालयाच्या मागील परिसराची पाहणी करून या समस्येकडे लक्ष वेधले.

👆 हे बगा व्हिडीओ; नारायण गोडे यांनी रुग्णालयाच्या मागील परिसराची पाहणी करताना

गोडे यांनी आरोप केला की, वणी मतदारसंघातील खनिज संपत्ती बाहेर नेली जाते, मात्र स्थानिक नागरिकांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा मात्र दुर्लक्षित राहतात. उभारलेले रुग्णालयच आज घाणीच्या विळख्यात सापडले आहे.

रुग्णालयकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसून रुग्णालय परिसरात वारंवार जनावरे मरून पडलेली दिसतात व सामाजिक कार्यकर्तेना नगरपालिकेकडे तक्रार करावी लागते, अशीही टीका त्यांनी केली. ट्रॉमा केअर सेंटरसह रुग्णालयातील अनेक सुविधा अपुऱ्या असून, त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव गमावले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील जनता कर भरते, मात्र सोयीसुविधांमध्ये कोणताही बदल दिसत नाही. “शहराच्या कार्यलय विभागात मोठमोठे अधिकारी येतात-जातात, पण जबाबदारीने कोणीही काम करत नाही. निष्काळजीपणा व बोगस कामांमुळे जनतेला वेठीस धरले जात आहे,” असा आरोप अनेकदा समाजिक कार्यकर्त्यांनी केला.

स्थानिक नागरिक व रुग्ण यांच्या वतीने आरोग्य विभाग व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून स्वच्छतेसह सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.


👆 रुग्णालय समस्यांवर गोडे यांची प्रतिक्रिया

Continue Reading

Previous: नंदू काळे, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 🎉
Next: बोगस डॉक्टरांकडून वणी तालुक्यात मोठी लूट!

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.