Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वाहतूक नियंत्रणासाठी चौकाचौकात गतिरोधक बसविण्याची मागणी
  • वणी

वाहतूक नियंत्रणासाठी चौकाचौकात गतिरोधक बसविण्याची मागणी

NewWaniDiary 11/09/2025

वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी चौकाचौकात गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वाखाली वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.

शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच काही दुचाकीस्वार व ऑटोचालक सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या वेळी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख परशुराम पोटे, यवतमाळ जिल्हा महिला संपर्कप्रमुख सौ. सुमित्राताई नारायण गोडे, जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा सुरेंद्र निब्रड, वणी शहराध्यक्ष अजय चन्ने, शहर महिला अध्यक्ष सौ. प्रेमीला मनोज चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बन्सोड, संजय चिंचोळकर, संदिप बेसरकर, राकेश दिकुंडवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading

Previous: महाराष्ट्र राज्य किसान सभाद्वारा वणी येथे; राज्यव्यापी कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भव्य परिषद संपन्न
Next: वणी येथे निःशुल्क स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबीर

Related Stories

SAVE_20261019_174622
  • वणी

१३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत; शिरपूर पोलिसांची कारवाई

NewWaniDiary 19/10/2026
SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.