Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे निःशुल्क स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबीर
  • वणी

वणी येथे निःशुल्क स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबीर

NewWaniDiary 11/09/2025

वणी (प्रतिनिधी) : लॉयन्स क्लब वणी व वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट, नॉर्थ नागपूर चॅप्टर-मेनोपॉज सोसायटी नागपूर व असोसिएशन ऑफ सर्जन्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबीर येत्या रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, देशमुखवाडी, वणी येथे होणार आहे. शिबीराचे उद्घाटन सकाळी ८.३० वाजता करण्यात येईल.

या शिबिरामध्ये नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असून महिलांशी संबंधित विविध आजारांची निःशुल्क तपासणी, निदान व मार्गदर्शन केले जाणार आहे.

शिबिरासाठी येणारे तज्ञ डॉक्टर:
डॉ. निर्मला वझ्रे, डॉ. पारुल सावनी, डॉ. प्राची उईके, डॉ. वैष्णवी वानखेडे, डॉ. उज्ज्वला देशमुख, डॉ. विद्या सुतवणे, डॉ. नेहा मल्लगवार, डॉ. नूतन आंबेकर, डॉ. निलम पुनियानी, डॉ. भावना पांडा.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी संपर्क:
मो. 9049851616 / 7378576008

Continue Reading

Previous: वाहतूक नियंत्रणासाठी चौकाचौकात गतिरोधक बसविण्याची मागणी
Next: वणी शहरात गांजाची विक्री उघडपणे सुरू – प्रशासनाच्या मौनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.