Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • जन्मदाती आईवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा
  • वणी

जन्मदाती आईवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा

NewWaniDiary 18/09/2025

वणी/पांढरकवडा (दि. १८ सप्टेंबर) – मौजा ब्राम्हणी (ता. वणी, जि. यवतमाळ) येथे स्वतःच्या जन्मदाती आईवर बलात्कार करणाऱ्या आरोपी राकेश दत्तू काळे (वय २६) यास सत्र न्यायालय, पांढरकवडा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

ही घटना जुलै २०२१ मध्ये घडली होती. पिडित आईवर आरोपीने वारंवार मारहाण करून, दारूच्या नशेत धमकावत अश्लील व्हिडिओ दाखवून रात्रीभर जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. शुद्धीवर आल्यानंतर तिने वणी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

वणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केल्यानंतर दोषारोपपत्र सत्र न्यायालय, केळापूर येथे दाखल करण्यात आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. रमेश डी. मोरे यांनी ८ साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध ठोस बाजू मांडली.

न्यायालयाने आरोपीस खालील शिक्षा सुनावल्या –

  • भा.दं.वि. कलम ३७६(२)(एफ), ३७६(२)(एन): जन्मठेप व ₹१०,००० दंड
  • कलम ३२३: १ वर्ष सश्रम कारावास व ₹१,००० दंड
  • कलम ५०६: २ वर्ष सश्रम कारावास व ₹४,००० दंड
    (दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा)

सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश मा. न्यायाधीश अभिजित देशमुख (सत्र न्यायालय, पांढरकवडा) यांनी दिला. आरोपीची बाजू अॅड. सिद्धार्थ लोढा यांनी मांडली. पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. संतोष मडावी (ब.नं. ७९२) यांनी कार्य केले.

Continue Reading

Previous: सावर्ला परिसरात अवैध वाळू वाहतूक – कारवाईला विलंब, अर्जदाराची न्यायालयीन परवानगीसाठी धाव
Next: न्यायालयीन शुल्क उपलब्ध करा – वणी वकील संघाची मागणी

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.