Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • पळसोनी शाळेचे बांधकाम ठप्प – अतिरिक्त शिक्षकाची मागणी
  • वणी

पळसोनी शाळेचे बांधकाम ठप्प – अतिरिक्त शिक्षकाची मागणी

NewWaniDiary 21/09/2025

वणी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पळसोनी येथील नवीन इमारत बांधकाम काही महिन्यांपासून थांबले आहे. जुनी शाळा पाडल्यानंतर सध्याचे वर्ग विठ्ठल-रुख्माई मंदिरात भरवले जात असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण मिळत नाही.

मुख्याध्यापिका परसावार मॅडम यांचे प्रमोशन झाल्याने 6 व 7 वी साठी केवळ एकच शिक्षक उरला असून शिक्षणावर परिणाम होत आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्याकडे निवेदन सादर करून थांबलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे व एक अतिरिक्त शिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनावर सरपंच नलूताई दूधबळे, उपसरपंच पुखराज खैरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नाईक, उपाध्यक्ष सरिता साठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Continue Reading

Previous: न्यायालयीन शुल्क उपलब्ध करा – वणी वकील संघाची मागणी
Next: वणीकरांवर करवाढीचा अन्याय – काँग्रेसकडून सोमवारी नगरपालिकेला निवेदन

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.