
वणी (प्रतिनिधी): राज्याचे मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या ताफ्याला वणी बसस्थानक परिसरात अडवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. या प्रकरणी शिवसेना (उबाठा) गटातील 12 जणांच्या जामीन अर्जास न्यायालयाने नकार दिला आहे.
सोमवारी रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात संबंधित 12 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन सुनावणीनंतर आज दि.७ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ८ च्या सुमारास त्यांना यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
यात जिल्हा प्रमुखांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश असून या कारवाईमुळे वणी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेत खळबळ उडाली आहे.
