Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील आंदोलन प्रकरणात जिल्हा प्रमुखांसह 12 शिवसैनिक तुरुंगात
  • वणी

वणीतील आंदोलन प्रकरणात जिल्हा प्रमुखांसह 12 शिवसैनिक तुरुंगात

NewWaniDiary 07/10/2025
वणी बस स्थानक परिसरातुन शिवसैनिकांना पोलीस ताफा नेताना छाया चित्र

वणी (प्रतिनिधी): राज्याचे मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या ताफ्याला वणी बसस्थानक परिसरात अडवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. या प्रकरणी शिवसेना (उबाठा) गटातील 12 जणांच्या जामीन अर्जास न्यायालयाने नकार दिला आहे.

सोमवारी रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात संबंधित 12 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन सुनावणीनंतर आज दि.७ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ८ च्या सुमारास त्यांना यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

यात जिल्हा प्रमुखांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश असून या कारवाईमुळे वणी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेत खळबळ उडाली आहे.

Continue Reading

Previous: वणीतील ३३ वर्षीय युवक बेपत्ता
Next: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकी घटनेचा वणीत काँग्रेसतर्फे तीव्र निषेध

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.