Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शेतकरी बांधवांसाठी महायुती सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी मदत
  • वणी

शेतकरी बांधवांसाठी महायुती सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी मदत

NewWaniDiary 12/10/2025

▪️देवाभाऊंना भाजपा वणी विधानसभा तर्फे धन्यवाद..

वणी (प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने आजवरची सर्वात मोठी मदत म्हणून तब्बल ₹३१,६२८ कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या मदतीत यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी-जामणी आणि मारेगाव तालुक्यांचा समावेश असून, शेतकरी बांधवांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

या मदतीनुसार —

▪️ कोरडवाहू शेतकऱ्यांना ₹१८,५००,

▪️ हंगामी बागायतींना ₹२७,०००,

▪️ बागायती शेतकऱ्यांना ₹३२,५०० प्रति हेक्टर अशी मदत मिळणार आहे.

यासाठी ६५ मिमी पावसाची अट रद्द करण्यात आली असून, मदतीची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टरपर्यंत वाढवली आहे.

तसेच विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹१७,००० अतिरीक्त मदत, तर जमीन खरडल्यास ₹४७,००० रोख अनुदान व नरेगा अंतर्गत ₹३ लाख, अशी एकूण ₹३.५ लाखांची मदत देण्यात येणार आहे.

जनावरांचे, घरांचे व विहिरींचे नुकसान झालेल्यांनाही शासनाकडून रोख भरपाई, तसेच मृत्यू किंवा अपंगत्व झालेल्या व्यक्तींना शासन नियमांनुसार ₹४ लाखांपर्यंत मदत मिळणार आहे.

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹१०,००० खत-बियाणे मदत थेट खात्यात जमा केली जाणार असून, पिककर्ज वसुली स्थगिती, विजबिल माफी, शाळा व परिक्षा शुल्क माफी यांसह अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिनांक १० ऑक्टोबर रोजी वणी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) व महाराष्ट्रातील महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

पत्रकार परिषदेस भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: मानसिक छळात रूपांतरित होणारे मानसिक खेळ सातत्याने वाढले
Next: मुकुटबन येथील आरसीसीपीएल (एम.पी. बिर्ला) सिमेंट कंपनीत आयटक संलग्न युनियनचा नामफलक अनावरण सोहळा उत्साहात

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.