Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • मुकुटबन येथील आरसीसीपीएल (एम.पी. बिर्ला) सिमेंट कंपनीत आयटक संलग्न युनियनचा नामफलक अनावरण सोहळा उत्साहात
  • वणी

मुकुटबन येथील आरसीसीपीएल (एम.पी. बिर्ला) सिमेंट कंपनीत आयटक संलग्न युनियनचा नामफलक अनावरण सोहळा उत्साहात

NewWaniDiary 12/10/2025

वणी (प्रतिनिधी): वणी-मुकुटबन येथे कार्यरत RCCPL (M.P. Birla) या सिमेंट कंपनीतील कामगारांना योग्य वेतन मिळावे आणि प्रलंबित प्रश्नांचे निराकरण व्हावे, या मागण्यांसाठी कामगारांनी एकत्र येत आयटक संलग्न जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन स्थापन केली.

युनियन स्थापनेनंतर कामगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून नुकतेच कंपनी परिसरात युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष काॅ. अनिल हेपट उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भाकपचे जिल्हासचिव काॅ. अनिल घाटे, तालुका सचिव काॅ. मोरेश्वर कुंटलवार, सहसचिव पांढुरंग ठावरी, कोषाध्यक्ष दिनेश शिटलवार तसेच सुधाकर कोंकमवार, गजानन पैसठवार, अथर्व निवडींग, अनिल भोयर, अरविंद बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नामफलकाचे अनावरण काॅ. अनिल हेपट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी लाल गुलाल उधळत घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमाचे संचालन अक्षय पुल्लीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश शिटलवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंढरी नांदेकर, राजु वर्हाटे, प्रफुल बंद्रे, रोशन चामाटे, अक्षय पुल्लीवार, मोरेश्वर कुंटलवार, दिनेश शिटलवार, निरज खैरकर, सुमित नगराळे, महादेव मेश्राम, अनिल मोंडे, प्रभुदास चाफले, कलीम खान पठाण, देवराव आत्राम, राकेश काकरवार, भुमन्ना आरमुरवार, राहुल येनगुर्तिवार, आकाश पारातळे, कवडु केळझरकर, सौरभ भांदेकर यांनी अथक प्रयत्न केले.

या प्रसंगी शेकडो कामगारांची उपस्थिती लाभली.

Continue Reading

Previous: शेतकरी बांधवांसाठी महायुती सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी मदत
Next: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.