Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • अचलपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाची तयारी पूर्ण जोमात सुरू
  • वणी

अचलपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाची तयारी पूर्ण जोमात सुरू

NewWaniDiary 22/10/2025

वणी (प्रतिनिधी): दि. १४ ऑक्टोबर रोजी अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची पूर्वतयारी बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीत अचलपूर विधानसभा प्रभारी संजय खाडे यांनी निरीक्षकांच्या भूमिकेतून मार्गदर्शन केले. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच आगामी निवडणुकांसाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीस काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. स्थानिक पातळीवरील समन्वय, प्रचार धोरण आणि जनसंपर्क मोहिमेवर सविस्तर चर्चा झाली.

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसाद पाहता पक्षात नवचैतन्य व ऊर्जा निर्माण झाल्याचे वातावरण दिसून आले.

Continue Reading

Previous: “प्रकाशाचा हा सण, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो — सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!”
Next: दिवाळी की दिवाळा?

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.