Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • नारायण गोडे यांच्या संभाव्य उमेदवारीने प्रभाग ४ चे राजकीय वातावरण तापले
  • वणी
  • राजकीय

नारायण गोडे यांच्या संभाव्य उमेदवारीने प्रभाग ४ चे राजकीय वातावरण तापले

NewWaniDiary 09/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (सर्वसाधारण पुरुष) मधून सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत स्थानिक स्तरावर चर्चा वाढत आहे. गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या गोडे यांनी यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या असून अनेकदा पराभव पत्करावा लागला आहे. राज्यातील काही राजकीय नेत्यांशी त्यांचा संपर्क असल्याची माहितीही स्थानिक वर्तुळात चर्चिली जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत गोडे एका पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याची अनौपचारिक चर्चा नागरिकांत सुरू झाली असून त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील व ग्रामीण भागातील काही गरजूंना केलेल्या मदतीमुळे त्यांच्या नावाची प्रभागात चर्चा होत असल्याचे नागरिक सांगतात. काही सामाजिक कार्यकर्ते, पुढारी आणि युवकांनीही त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत रस दाखवल्याची माहिती मिळते.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ४ मधील दोन उमेदवारांची नावे अधिकृतरीत्या जाहीर झाली असून काहींची घोषणा अद्याप बाकी आहे. त्यामुळे प्रभागात स्पर्धा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून स्थानिक राजकीय वातावरणात चाचपणी आणि चर्चांना वेग आला आहे. मतदारांचे लक्ष संभाव्य उमेदवारांकडे लागले आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग ५ : निमकर व पडोळे यांच्या उमेदवारीला अधिकृत मुहर; ताजणे चर्चेत, तिहेरी लढतीची शक्यता
Next: वणी : प्रभाग ५ मध्ये संदीप खोब्रागडे व कपिल मेश्राम काही इतर नावे चर्चेत

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.