Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी : प्रभाग ५ मध्ये संदीप खोब्रागडे व कपिल मेश्राम काही इतर नावे चर्चेत
  • वणी
  • राजकीय

वणी : प्रभाग ५ मध्ये संदीप खोब्रागडे व कपिल मेश्राम काही इतर नावे चर्चेत

NewWaniDiary 10/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ (SC पुरुष आरक्षित) मध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध समाजघटकांतील कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात सक्रिय तरुण तसेच आधी निवडणूक लढवलेल्या काही व्यक्तींना पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काहींची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.

रा. दामले नगर येथील संदीप खोब्रागडे हे पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रा. भीमनगर येथील कपिल मेश्राम यांचे नावदेखील चर्चेत आहे. प्रभागात ही आणि काही इतर नावे मतदारांमध्ये सध्या चर्चेत असून पुढील काही दिवसांत उमेदवारींची संख्या वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या निवडणुकीत मतदार अधिक सजगपणे आपला प्रतिनिधी निवडतील, अशी चिन्हे प्रभागात दिसत आहेत.

Continue Reading

Previous: नारायण गोडे यांच्या संभाव्य उमेदवारीने प्रभाग ४ चे राजकीय वातावरण तापले
Next: वणी प्रभाग ६ मध्ये गौतमी खोब्रागडे यांचे नाव चर्चेत

Related Stories

SAVE_20261019_174622
  • वणी

१३ वर्षांपासून फरार आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत; शिरपूर पोलिसांची कारवाई

NewWaniDiary 19/10/2026
SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.