Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाने शिंदे गटाला नवी गती; रॅलीत हजारोंची उपस्थिती
  • वणी
  • राजकीय

विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाने शिंदे गटाला नवी गती; रॅलीत हजारोंची उपस्थिती

NewWaniDiary 18/11/2025

▪️ अध्यक्ष व २९ उमेदवारांचे अर्ज दाखल; शिंदे गट आघाडीवर..

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)कडून दि. १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारांचे नामांकन अर्ज जल्लोषात दाखल करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि मोठ्या शक्तीप्रदर्शनासह निघालेल्या रॅलीने संपूर्ण शहरात केशरी लाट उसळली.

राजकारणातील ज्येष्ठ नेते व समाजसेवक विजय चोरडिया यांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी शिवसेना (शिंदे गट)मध्ये अधिकृत प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे वणीच्या राजकारणात मोठा बदल घडल्याची चर्चा आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत झालेल्या या प्रवेशाने तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले.

चोरडिया यांच्या प्रवेशानंतर शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असून भाजप गोटात नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या चोरडिया यांच्या लोकप्रियतेमुळे अनेक अनुभवी कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत असल्याची माहिती मिळते.

दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी वणीचे कुलदैवत श्री रंगनाथ स्वामी देवस्थान येथून निघालेल्या रॅलीदरम्यान शहरातील अनेक प्रमुख चौकांत विजय चोरडिया यांचे भव्य स्वागत करण्यात आले. केवळ सव्वा महिन्यातच पक्ष मजबुती केल्याचे चित्र दिसत असून अध्यक्षपदासह २९ नगरसेवक पदांचे अर्ज या रॅलीत दाखल करण्यात आले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शिंदे गटाचे वर्चस्व अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा समन्वयक हरिहर लिंगमवार,विनोद मोहितकर,बंटी ठाकूर ,सुनिल नांदेकर,शिवराज पेचे,किरणताई नांदेकर आदींच्या नेतृत्वाखाली वणी–झरी–मारेगाव तालुक्यात शिंदे गटाने मजबूत संघटना निर्माण केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या शक्तीप्रदर्शनानंतर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गट आघाडीवर गेल्याचे स्पष्ट चित्र दिसत असून वणीच्या राजकारणात महत्त्वाचे बदल घडण्याची चिन्हे व्यक्त केली जात आहेत.

Continue Reading

Previous: उत्सवाच्या वातावरणात महाविकास आघाडी उमेदवारांचे नामांकन दाखल
Next: वंचित बहुजन आघाडीची रॅली; उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.