Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग ४ मध्ये नारायण गोडे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; चौफेरी लढतीची चिन्हे
  • वणी
  • राजकीय

प्रभाग ४ मध्ये नारायण गोडे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; चौफेरी लढतीची चिन्हे

NewWaniDiary 20/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (सर्वसाधारण पुरुष) मधून सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या गोडे यांनी यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या असून काही पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचे जनसंपर्क भक्कम असल्याचे स्थानिकांचे मत आहे. राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क असल्याची माहितीही नागरिकांत चर्चेत आहे.

यंदा गोडे यांना आम आदमी पार्टीकडून उमेदवारी मिळाल्याची चर्चा वेगाने पसरली असून त्यामुळे मतदारांत उत्सुकता वाढली आहे. शहर व ग्रामीण भागातील रुग्ण, गरीब आणि गरजू नागरिकांना केलेल्या मदतीमुळे त्यांच्या नावाची प्रभागात सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे नागरिक सांगतात. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, काही पुढारी आणि युवकांनीही त्यांच्या समर्थनार्थ हालचाली सुरू केल्याचे समजते.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप, महाविकास आघाडी, शिवसेना (शिंदे गट) आणि आम आदमी पार्टी या पक्षांच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा असून चौफेरी लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रभागातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून मतदारांचे लक्ष संभाव्य उमेदवारांकडे केंद्रीत झाले आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग ९ मधून डॉ. अतिक सैय्यद अपक्ष उमेदवार; सामाजिक कार्याचा मजबूत ठसा, मतदारांचे वाढते आकर्षण
Next: प्रभाग १२ मधून हरिदास गेडाम अपक्ष उमेदवार; स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.