Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • महाविकास आघाडीची प्रभाग ५ मध्ये भव्य प्रचार रॅली; उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • वणी
  • राजकीय

महाविकास आघाडीची प्रभाग ५ मध्ये भव्य प्रचार रॅली; उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

NewWaniDiary 28/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये महाविकास आघाडीची भव्य प्रचार रॅली दि. २७ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली. या रॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून डॉ. संचिता विजय नगराळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर असून अनेक प्रभागात मतदारांना भेटी घेऊन संवाद साधत जनसामान्य पर्यंत प्रचार सुरू आहे.

प्रभाग ५ मधील नगरसेवक पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. (सर्वसाधारण महिला) जागेतून अर्चना सुभाष ताजणे — मशाल चिन्हावर निवडणुकीत उभे असून (SC पुरुष) राखीव जागेतून गैतम जीवने — पंजा चिन्हावर निवडणुकीत उभे आहे.

प्रभागात भीम नगर, तेली फैल, सिंघी कॉलनी, दामले नगर, राम शेवाळकर परिसर, आदर्श कॉलनी आदी भागांचा समावेश असून २ डिसेंबरला मतदान होणार आहे.

या प्रचार रॅलीस आमदार संजय देरकर यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Continue Reading

Previous: संविधान मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त; वणीमध्ये संविधान दिनानिमित्त अभिवादन
Next: प्रभाग ५ मध्ये विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेची धारदार भूमिका; सभा यशस्वी

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.