
वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये महाविकास आघाडीची भव्य प्रचार रॅली दि. २७ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली. या रॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून डॉ. संचिता विजय नगराळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर असून अनेक प्रभागात मतदारांना भेटी घेऊन संवाद साधत जनसामान्य पर्यंत प्रचार सुरू आहे.

प्रभाग ५ मधील नगरसेवक पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. (सर्वसाधारण महिला) जागेतून अर्चना सुभाष ताजणे — मशाल चिन्हावर निवडणुकीत उभे असून (SC पुरुष) राखीव जागेतून गैतम जीवने — पंजा चिन्हावर निवडणुकीत उभे आहे.
प्रभागात भीम नगर, तेली फैल, सिंघी कॉलनी, दामले नगर, राम शेवाळकर परिसर, आदर्श कॉलनी आदी भागांचा समावेश असून २ डिसेंबरला मतदान होणार आहे.

या प्रचार रॅलीस आमदार संजय देरकर यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
