Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • हरदोना खुर्द येथे; संविधान सन्मान दिन संपन्न!
  • चंद्रपूर

हरदोना खुर्द येथे; संविधान सन्मान दिन संपन्न!

NewWaniDiary 29/11/2025

चंद्रपूर (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचा जागर करण्याच्या उद्देशाने हरदोना खुर्द ग्रामपंचायत कार्यालय ( जुने ) तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे बूधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ ला संविधान सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून आणि पुष्पमाला अर्पण करून मोठ्या उत्साहात गावातील मुख्य मार्गानें मिरवणूक काढण्यात आली. गावातील मुख्य चौकात भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. मिरवणुकीत भारतीय राज्यघटनेचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत हरदोना खुर्द येथील पोलिस पाटील धनपाल उपरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव वाटेकर, ग्रामपंचायत उपसरपंच एकनाथ मुठ्ठलकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हाध्यक्ष तथा अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई धोंगडे, चंपत राजुरकर कुकुडसाथ, रेषमाताई खोब्रागडे, केशरताई कातकर इत्यादी गावातील प्रतिष्ठित नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक मुख्य मार्गानें काढण्यात आल्यानंतर संविधानावर मार्गदर्शनपर भाषण आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुनेश्वर मेश्राम उपरवाही यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्घाटक- तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव वाटेकर प्रमुख पाहुणे सुरजभाऊ उपरे जिल्हा युवा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तथा संस्थापक अध्यक्ष अनैशा वाहन चालक कामगार संघटना,एकनाथ मुठ्ठलकर उपसरपंच ग्रामपंचायत हरदोना, पोलिस पाटील धनपाल उपरे, ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई धोंगडे, चंपत राजुरकर कुकुडसाथ, रेषमाताई खोब्रागडे, केशरताई कातकर इत्यादी गावातील प्रतिष्ठित नागरिक मार्गदर्शनपर कार्यक्रमात सहभागी झाले होते

कार्यक्रमाचे प्रस्तावित, भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन, संचालन आणि आभार प्रदर्शन दिनेश गायकवाड यांनी केले.

संविधान सन्मान आणि जागृती कार्यक्रमात सुनंदा शिंदे, धनपाल उपरे, आरती सुरज उपरे, संजिवनी पेरगार, अंजली गायकवाड, अदविक राकेश खेडकर, दिव्या राकेश खेडकर, अनैशा उपरे, रोहित काळे, त्रिशा काळे, खुर्शीद बारसागडे, मानवी धनरे, देवांषी गुरनुले, आरोही सिडाम, किंजल मडावी, तनय, आरोओ उपरे, मार्या सरोदे, खुशाल टेकाम इत्यादींनी आपला सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

Continue Reading

Previous: वणीत संविधान दिनानिमित्त २९ नोव्हेंबरला व्याख्यान
Next: “वणीतील पाणीटंचाई संपवण्याची गर्जना; प्रभाग 2 व 8 मध्ये आघाडीचा जोरदार टप्पा”

Related Stories

SAVE_20260203_123401
  • चंद्रपूर

गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी

NewWaniDiary 03/02/2026
SAVE_20260127_164735
  • चंद्रपूर

गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार

NewWaniDiary 29/01/2026
SAVE_20260107_144452
  • चंद्रपूर

ऐतिहासिक बुद्धभूमी; गडचांदूर येथे ८ जानेवारीला जागतिक धम्मध्वज दिन सोहळा

NewWaniDiary 07/01/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.