Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग ५ मध्ये कपिल मेश्राम यांच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा; आजची प्रचार रॅली उत्साहात
  • वणी
  • राजकीय

प्रभाग ५ मध्ये कपिल मेश्राम यांच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा; आजची प्रचार रॅली उत्साहात

NewWaniDiary 30/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ५ मधून सामाजिक कार्यकर्ते कपिल मेश्राम यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली असून, आज दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या प्रचार रॅलीला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. महिला, पुरुष तसेच तरुणांच्या मोठ्या सहभागामुळे रॅलीला विशेष ऊर्जित वातावरण निर्माण झाले. घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत मेश्राम यांनी आपला प्रचार अधिक गतीमान केला.

स्थानिक राजकारणात त्यांच्या अपक्ष लढतीची जोरदार चर्चा रंगली आहे. वार्डातील प्रलंबित प्रश्नांवर पालिकेकडे सतत पाठपुरावा — या कार्यांमुळे कपिल मेश्राम सक्रिय आणि कर्तव्यनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये भीमनगर, दामले नगर, तेली फैल, सिंधी कॉलनी, रामशेवाळकर परिसर, आदर्श कॉलनी या वस्त्यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी मेश्राम यांनी गेल्या महिनाभरापासून काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली होती. पक्षाकडून त्यांना ‘बी-फॉर्म’ही देण्यात आला होता, तसेच अनेक स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत होते.

मात्र, १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री त्यांच्या उमेदवारीला अनपेक्षितरित्या रद्द करण्यात आले. काही हितसंबंधी गटांच्या दबावामुळे हे घडल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. उमेदवारी कापल्यानंतर मेश्राम यांच्या समर्थकांत तीव्र नाराजी पसरली असून सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, त्यांच्या अपक्ष उमेदवारीने प्रभागातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, पुरुष गटातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा जोर धरत आहे. विशेषतः भीमनगर परिसरात हा विषय अधिक चर्चेत असल्याचे दिसत आहे.

Continue Reading

Previous: वणीच्या राजकारणात तापलेले वातावरण; शिवसेनेची शक्तिप्रदर्शन रॅली ठरली लक्षवेधी
Next: मतदारांचा कल बदलतोय; प्रभाग ५ मध्ये संदीप खोब्रागडे ‘फरक’ निर्माण करताना दिसत

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.