Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीच्या राजकारणात तापलेले वातावरण; शिवसेनेची शक्तिप्रदर्शन रॅली ठरली लक्षवेधी
  • वणी
  • राजकीय

वणीच्या राजकारणात तापलेले वातावरण; शिवसेनेची शक्तिप्रदर्शन रॅली ठरली लक्षवेधी

NewWaniDiary 30/11/2025

▪️ वणी नगरपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत शिवसेनेला वेग…

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांकडून सभा, पदयात्रा आणि घरदार संपर्क मोहिमा जोमात सुरू असून प्रचंड थंडीमध्येही प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, आज दि. ३० नोव्हेंबर रोजी शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार कु. पायल यशवंत तोडसाम तसेच सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली.

रॅलीची सुरुवात सकाळी १० वाजता शासकीय मैदान (पाण्याच्या टाकीजवळ) येथून करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर रॅलीचा मार्ग पुढील प्रमुख चौकांतून पुढे सरकला—
खाती चौक – महात्मा गांधी चौक – संत गाडगे महाराज चौक – शहीद भगतसिंग चौक – स्वातंत्र्यवीर सावरकर चौक – नेताजी सुभाषचंद्र बोस चौक – टैगोर चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, येथे बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या विशाल मिरवणुकीत हजारो महिला, पुरुष आणि युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

रॅलीदरम्यान विविध चौकांत शिवसेना नेते विजय चोरडिया यांचे हार घालून आणि घोषणाबाजी करत स्वागत करण्यात आले. वणीच्या मार्केट लाइन परिसरातील नागरिकांनी घरांवरून फुलांचा वर्षाव करून उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. केवळ सव्वा महिन्यात पक्षाची वाढलेली ताकद या रॅलीत स्पष्टपणे दिसून आल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले.

नगराध्यक्ष पदासह २९ नगरसेवक पदांचे उमेदवार रॅलीत उपस्थित होते. तसेच विनोद मोहितकर, मनिष सुरावार, कुणाल चोरडिया, बंटी ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेवटी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता करण्यात आले.

राजकीय जाणकारांच्या मते, ही रॅली विरोधकांसाठी निश्चितच एक मोठे आव्हान निर्माण करणारी ठरली आहे.

Continue Reading

Previous: धनुष्यबाण मैदानात उतरल्याने प्रभाग १३ चे राजकारण तापले; शिवसेनेची रॅली उत्साहात
Next: प्रभाग ५ मध्ये कपिल मेश्राम यांच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा; आजची प्रचार रॅली उत्साहात

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.