Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • अखेर हालचाल: ग्रामीण रुग्णालय चौकात स्ट्रीट लाईटचे काम सुरू
  • वणी

अखेर हालचाल: ग्रामीण रुग्णालय चौकात स्ट्रीट लाईटचे काम सुरू

NewWaniDiary 13/12/2025

▪️ महत्त्वाच्या चौकात स्ट्रीट लाईटला विलंब का? नागरिकांचा सवाल..

फोटो कॅप्शन : ग्रामीण रुग्णालयाजवळील कॉर्नर चौकात अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून असलेले स्ट्रीट लाईटचे खांब व आता सुरू झालेले सिमेंट फोडेशनचे काम – नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेली सुविधा अखेर हालचालीत.

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील ग्रामीण रुग्णालयाबाहेरील कॉर्नर चौक परिसरात हायमॅक्स स्ट्रीट लाईट सौरऊर्जेवर बसविण्याचे काम अखेर सुरू झाले आहे. मात्र या कामास झालेल्या मोठ्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या परिसरात स्ट्रीट लाईटचे खांब अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला टाकून ठेवण्यात आले होते. रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट बांधकामादरम्यान बांधकाम कंत्राटदाराकडून खोदकामातील माती थेट या लाईटच्या खांबांवर टाकण्यात आल्याचेही निदर्शनास आले.

वणी येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) चे उद्घाटन तसेच नवीन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन दि. १५ जून २०२५ रोजी करण्यात आले होते. या भव्य समारंभाचे उद्घाटन उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायमूर्ती सांबरे यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमानंतर संबंधित स्ट्रीट लाईटचे खांब रस्त्याच्या कडेला तसेच रस्त्याच्या बांधकामादरम्यान मातीखाली गाडले गेले होते.

शहरातील काही भागांत सात–आठ महिने आधीच स्ट्रीट लाईट बसविण्यात आले असताना, या महत्त्वाच्या चौकात काम सुरू होण्यास इतका विलंब का झाला, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या येथे स्ट्रीट लाईटसाठी सिमेंट फोडेशनचे काम सुरू करण्यात आले आहे.

या मार्गावर ग्रामीण रुग्णालय, शेतकरी मंदिर, कब्रस्थान, रामशेवाळकर बिझनेस पार्क आदी महत्त्वाची ठिकाणे असून येथे दिवसरात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अंधारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन वर्षांपासून पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती असून, नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वणी विधानसभा मतदारसंघात काही प्रशासकीय विभागांकडून कामांमध्ये हलगर्जीपणा होत असल्याची चर्चा असून, दलित वस्तीअंतर्गत मूलभूत सोयी-सुविधांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.

या कामांची तातडीने पूर्तता करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Continue Reading

Previous: सम्राट अशोक नगरमध्ये जुने बौद्धविहार जमीनदोस्त; बांधकाम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी तक्रार
Next: यवतमाळ मुख्य रस्त्यावर सुरक्षेचा अभाव; रामशेवाळकर बिझनेस पार्क व चिखलगाव रेल्वे गेट परिसर धोकादायक

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.