Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • सम्राट अशोक नगरमध्ये जुने बौद्धविहार जमीनदोस्त; बांधकाम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी तक्रार
  • वणी

सम्राट अशोक नगरमध्ये जुने बौद्धविहार जमीनदोस्त; बांधकाम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी तक्रार

NewWaniDiary 09/12/2025

वणी (प्रतिनिधी): सम्राट अशोक नगर येथे असलेले सर्वात जुने बौद्धविहार जीर्ण झाल्याने ते जमीनदोस्त करून नवीन बौद्धविहार उभारण्याचा संकल्प समाज बांधवांनी केला आहे. जुन्या विहाराचे बांधकाम करताना उरलेल्या विटा व मलबा काही गैरअर्जदाराने याआधीच चोरून नेल्याची समाजाला माहिती झाली होती; मात्र तो संबंधित समाजातीलच व्यक्ती असल्याने कोणतीही कारवाई तेव्हा करण्यात आली नाही.

मात्र दि. ३०-११-२०२५ रोजी सायंकाळी अंदाजे ६.१८ वाजता आणि दि. ०५-१२-२०२५ रोजी सकाळी अंदाजे ६.०३ वाजता संबंधित गैरअर्जदार आपल्या घरातून बाहेर पडून विहाराचे लोखंडी अँगल नेत असल्याचे राकेश पाटील यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. असे समाज बांधवांनकडून सांगण्यात येत आले.

नवीन बौद्धविहाराच्या बांधकामासाठी बाजारातून साहित्य आणल्यानंतरही तो चोरीचा प्रयत्न करू शकतो, अशी भीती समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी सम्राट अशोक नगर, वणी येथील समाज बांधवांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये लिखित तक्रार दाखल केली असून गैरअर्जदारावर चोरीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Continue Reading

Previous: शिवविवाहात महामानवांच्या विचारांचा जागर – यवतमाळ व वरोरा वासियांनी अनुभवला आदर्श शिवविवाह
Next: अखेर हालचाल: ग्रामीण रुग्णालय चौकात स्ट्रीट लाईटचे काम सुरू

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.