Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • यवतमाळ मुख्य रस्त्यावर सुरक्षेचा अभाव; रामशेवाळकर बिझनेस पार्क व चिखलगाव रेल्वे गेट परिसर धोकादायक
  • वणी

यवतमाळ मुख्य रस्त्यावर सुरक्षेचा अभाव; रामशेवाळकर बिझनेस पार्क व चिखलगाव रेल्वे गेट परिसर धोकादायक

NewWaniDiary 14/12/2025

▪️ स्पीड ब्रेकर व स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता..

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील रामशेवाळकर बिझनेस पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून यवतमाळकडे जाणारा प्रमुख मार्ग जातो. मात्र या ठिकाणी स्पीड ब्रेकर व स्ट्रीट लाईटची कोणतीही व्यवस्था नसल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून अनेक वाहने अति वेगाने धावत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

या परिसरात लहान मुलांसह खरेदी व खाद्यपदार्थांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मुख्य गेटसमोरच रस्ता असल्याने रात्रीच्या वेळी प्रकाशाअभावी अपघाताची शक्यता अधिक वाढते. विशेषतः रामशेवाळकरच्या मेन गेटपासून चिखलगाव रेल्वे गेट मार्गे मुकुटबन रोडवरील लखन बारपर्यंत संपूर्ण मार्गावर एकही स्ट्रीट लाईट नसल्याचे चित्र आहे.

अटारा ऑटोमोबाईल्स परिसरात काही ठिकाणी रस्त्यावर खडे पडले असून, तर काही ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

चिखलगाव रेल्वे गेटसमोरील उड्डाणपुलाचे काम मागील वर्षभरापासून अत्यंत धीम्या गतीने सुरू असून, उड्डाणपुलाच्या बाजूनेही प्रकाश व्यवस्थेचा अभाव आहे. परिणामी नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागत असून, उखडलेला रस्ता व खडे यांमुळे रात्री जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.

वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास एखादी मोठी व अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेवाळकर परिसर ते यवतमाळ मुख्य मार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजवून रस्ता तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे.

तसेच या मार्गावर स्ट्रीट लाईट, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण व मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. रस्ता रुंदीकरणात पूर्वीची मोठी निंबाची झाडे तोडण्यात आली; मात्र पर्यायी वृक्षारोपण झालेले नाही. काही भाग चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत तर काही भाग वणी नगरपालिकेच्या हद्दीत येत असल्याने, सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून रस्त्याची दुरुस्ती, स्पीड ब्रेकर बसवणे, स्ट्रीट लाईटची व्यवस्था व वृक्षारोपणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Continue Reading

Previous: अखेर हालचाल: ग्रामीण रुग्णालय चौकात स्ट्रीट लाईटचे काम सुरू
Next: माजी आमदार विश्वास नांदेकर यांची लीलावती रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.