Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • माजी आमदार विश्वास नांदेकर यांची लीलावती रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
  • मुंबई
  • वणी

माजी आमदार विश्वास नांदेकर यांची लीलावती रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

NewWaniDiary 17/12/2025


वणी (प्रतिनिधी) – मुंबईतील लीलावती रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी शिवसेना आमदार विश्वास नांदेकर यांची दि. १६ डिसेंबर रोजी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. नांदेकर यांच्यावर ६ वा मजला, रूम नं. ६४१ येथे उपचार सुरू आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नांदेकर यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली तसेच त्यांच्या उपचारांबाबत उपस्थित डॉक्टरांकडून माहिती घेतली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

याचवेळी वणी येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनीही रुग्णालयात जाऊन विश्वास नांदेकर यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीबाबत फोनद्वारे माहिती दिली.

या प्रसंगी नांदेकर यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर उपस्थित होते.

Continue Reading

Previous: यवतमाळ मुख्य रस्त्यावर सुरक्षेचा अभाव; रामशेवाळकर बिझनेस पार्क व चिखलगाव रेल्वे गेट परिसर धोकादायक
Next: डॉ. संचिता विजय नगराळे यांचा वाढदिवस स्नेहपूर्ण वातावरणात साजरा; केक कापून पुष्पगुच्छ व “तथागत” महामानवांवरील पुस्तके भेट

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.